पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा शानदार प्रारंभ

‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मल्हार (सौरभ चौघुले) सोबत अंतरा (योगीता चव्हाण), दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, कॅपिटल फूडचे समीर परब, रॉनिक स्मार्ट वॉटर हिटरचे तानाजी पोवार, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आदी.
‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मल्हार (सौरभ चौघुले) सोबत अंतरा (योगीता चव्हाण), दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, कॅपिटल फूडचे समीर परब, रॉनिक स्मार्ट वॉटर हिटरचे तानाजी पोवार, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या 'पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल'चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी चमचमीत, झणझणीत आणि तशाच लज्जतदार पदार्थांची मेजवानी, गृहोपयोगी साहित्यांच्या खरेदीची पर्वणी साधता येणार आहे. हा फेस्टिव्हल पाच दिवस रंगणार आहे. याचे दै. 'पुढारी' आणि टोमॅटो एफ. एम., कस्तुरी क्लबतर्फे आयोजन केले आहे.

हा फेस्टिव्हल 28 डिसेंबरपर्यंत आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राऊंड, पार्वती मल्टिप्लेक्सजवळ, कोल्हापूर येथे 'पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल'चे उद्घाटन कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' मालिका फेम मल्हार (सौरभ चौघुले) व अंतरा (योगीता चव्हाण) यांच्या हस्ते झाले. यावेळी दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, कॅपिटल फूडचे समीर परब, रॉनिक स्मार्ट वॉटर हिटरचे तानाजी पोवार प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रदर्शनाचे सहप्रयोजक चिंग्ज सिक्रेट आणि रॉनिक स्मार्ट हिटर असून, क्रेझी आइस्क्रीम हे आइस्क्रीम पार्टनर आहेत. एंटरटेन्मेंट पार्टनर कलर्स मराठी वाहिनी आहे.

28 डिसेंबरपर्यंत कोल्हापूरकरांना या फेस्टिव्हनद्वारे मेजवानीच मिळणार आहे. नाताळानिमित्त प्रवेशद्वारावर आकषर्क सजावट केली आहे. मुख्य मंडपात सांताक्लॉज ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताची रेनडिअरगाडी आदीने केलेली सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. फेस्टिव्हलसाठी डोम पद्धतीच्या खास मंडपात आकर्षक रंगसंगती करण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण मंडप खवय्यैकर कोल्हापूरकरांच्या गर्दीने फुलून गेला. नागरिक सहकुटुंब येत होते. प्रवेशद्वाराची आकर्षक कमान, आत नाताळानिमित्त केलेला आकर्षक देखावा, विविध गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल आणि खाद्यपदार्थांची रेलचेल अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात अनेकांनी अनोख्या पद्धतीने फेस्टिव्हलमध्ये नाताळाची सुट्टी एंजॉय केली. कोरोनापासून पूर्णतः खबरदारी घेण्यात आली आहे. मास्कशिवाय फेस्टिव्हल मंडपात प्रवेश दिला जात नाही. तसेच मंडप सॅनिटाईझ केला जातो.

मल्हार, अंतराची रिक्षातून एंट्री

'पुढारी' शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी 'जीव माझा गुंतला' मालिका फेम मल्हार व अंतरा यांनी रिक्षातून एंट्री केली. ही रिक्षा अंतरा चालवत होती. तर, मागे मल्हार बसला होता. मुख्य मंडपाच्या प्रेवशद्वारावर येताच. चहात्यांनी एकच जल्लोष केला. उद्घाटनानंतर या दोन्ही कलाकारांनी मंडपातील स्टॉलना भेटी देऊन दीपप्रज्वलन केले. यानंतर उपस्थित कोल्हापूरवासीयांबरोबर दिल खुलास गप्पा मारल्या. यानंतर मैदानवरील झोपाळा आणि इतर खेळण्याचा आनंदही घेतला.

कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरणाची सुविधा

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येत आहे. अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटल याच सामाजिक बांधिलकीमधून दै.'पुढारी' शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये येणार्‍या नागरिकांसाठी मोफत कोव्हिशिल्ड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 25, 27 व 28 डिसेंबर सकाळी 11 ते 3 या वेळेत हे मोफत लसीकरण सुरू राहणार आहे. या लसीकरणासाठी सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

सेल्फी पॉईंट

नाताळानिमित्त मुख्य मंडपात प्रवेशद्वारावर सांताक्लॉज ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताची रेनडिअर गाडी आदीने केलेली सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. हा सेल्फी पॉईंट असून, येथे अबालवृद्धांची गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news