

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सचिन अरुण पाटील (वय 33) याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन पाटील याच्याविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून याला अटक केली आहे.
संशयित पाटील याचे कोतोली येथे हॉटेल आहे. तो व पीडित मुलगी एकाच गावचे रहिवासी आहेत. संशयिताची पीडित मुलीच्या घरी ये-जा होती. याचा गैरफायदा घेऊन संशयित पाटील याने पीडित मुलीशी जानेवारी ते मार्च 2022 या काळात वेळोवेळी संबंध ठेवले. पीडितेच्या पोटात वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले असता डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर तिच्या आईसह नातेवाईकांनी पन्हाळा पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. पीडितेने जबाबात सचिन पाटील याने वेळोवेळी संबंध ठेवल्याचे पोलिसांना सांगितले.