नादाला लागाल तर कार्यक्रम करू : आ. महेश शिंदे

नादाला लागाल तर कार्यक्रम करू : आ. महेश शिंदे
Published on
Updated on

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा : आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर, अख्ख राज्य बदलून टाकलयं, हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागला तर तुमचा नक्की कार्यक्रम करू. आमच्यासोबत मुख्यमंत्री दाढीपण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपण आहेत. आता ठाण्याची दाढी आहे, ते टायमिंग आले की कार्यक्रम करतातच, अशा शब्दात आ. महेश शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात संधी देतील, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

कोरेगाव शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण आ. महेश यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते. आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदार संघ बदलला आहे. येथील आमदार आता महेश शिंदे आहे. यापुढं गुंडगिरी दहशत सहन केली जाणार नाही. आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर अख्ख राज्य बदलून टाकलय हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागाल तर कार्यक्रम करू. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढीपण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपण आहेत.

कोरेगावच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेसाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी मॉफकोमधील 4 एकर जागा आमच्या ताब्यात येत आहे. मागच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी जिरवण्याच्या नादात ती जागा जाणीवपूर्वक मिळून दिली नसल्याचे सांगत आ. महेश शिंदेंनी आ. अजित पवारांना टोला लागवला.

राष्ट्रवादीला विचारधारा काय आहे? याच उचल त्याचं उचल. कारखाना, सूतगिरणी खाऊन भ्रष्टाचार करणे असले राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा विसर हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांना आता पक्ष टिकवणे अवघड झाले आहे म्हणूनच रोहित पवार निवडणुका लागतील विधान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

आ. शशिकांत शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहेत. यावर बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले, तसे झाल्यास त्यांना मिठीत घेऊन स्वागत करू. इतक्या दिवसांनी त्यांचे नेते चुकीचे होते याची त्यांना उपरती झाली. ते ज्या नेतृत्वाखाली काम करत होते ते चुकीचे करत होते. या मतदारसंघाला लुटत होते हे त्यांना पटलं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात संधी देतील. शिवसेनेचे 80 टक्केजिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. काही ठराविक जणांना पक्षात घेणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news