

नरसी फाटा (जि. नांदेड), पुढारी वृत्तसेवा : नांदेड-देगलूर महामार्गावरील कुंचेली फाट्याजवळ ट्रक आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण मरण पावले. शुक्रवारी रात्री आठ वाजता ही दुर्घटना घडली.
नरसीकडून शंकरनगरकडे जाणार्या स्विफ्ट डिझायर कारला (एमएच 25 /टी 1075) ट्रकने ( एपी 03/ टीए 3186) समोरून धडक दिली. या अपघातात कारमधील शंकरराव गंगाराम जाधव (55), महानंदा शंकरराव जाधव (52, रा. टाकळी, ता. नायगाव), त्यांची कन्या कल्पना शिंदे (36, रा. बिलोली) हे जागीच ठार झाले. तर मुलगा धनंजय जाधव, नात स्वाती शिंदे (19) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात पाठविले. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.