Latest
नव्या वर्षात सरकारी कर्मचार्यांना मिळणार 24 सार्वजनिक सुट्ट्या
मुंंबई; पुढारी वृत्तसेवा : 2023 मध्ये फक्त दोन शासकीय सुट्ट्या रविवारी आल्याने सरकारी कर्मचार्यांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्यांचा लाभ होणार आहे. 2022 हे वर्ष संपत असताना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने येत्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
सर्वाधिक 3 सुट्ट्या मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात आहेत. तर फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांत दोन सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. पुढील वर्षी 19 फेब्रुवारी आणि आणि 12 नोव्हेंबरला अनुक्रमे शिवजयंती व लक्ष्मीपूजन रविवारी येत असल्याने सरकारी कर्मचार्यांच्या या दोन सुट्ट्या कमी झाल्या आहेत.

