दै.’पुढारी प्रयोग सोशल फाऊंडेशनच्यावतीने जिल्हास्तरीय ‘आयक्यु टेस्ट’ उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

दै.’पुढारी प्रयोग सोशल फाऊंडेशनच्यावतीने जिल्हास्तरीय ‘आयक्यु टेस्ट’ उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद
Published on
Updated on

निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीबरोबरच व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी या उद्देशाने दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुलच्यावतीने आयोजीत 'आयक्यु टेस्ट' उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निपाणीतील 'गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल' येथे या जिल्हास्तरीय उपक्रमाचे (दि.२७ ) आयोजन करण्यात आले होते. तीन ते बारा या वयोगटातील मुले यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'गोमटेश'चे उदय पाटील उपस्थित होते. गुढीपाडवा (दि. २) यादिवशी प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रम देण्यात येणार असून पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर उपक्रमात प्रसिद्ध निवेदिका ,व्याख्यात्या महेश्वरी गोखले यांनी 'बालसंस्कार व संगोपन' या विषयावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. गोखले म्हणाल्या, आपलं घर ही एक प्रयोगशाळा आहे. घराच्या बाल्कनीमध्ये दोन छोट्या कुंड्या ठेवून तुम्ही निसर्गाशी जवळीक साधण्याचा संदेश मुलांना देऊ शकता.

जगाचा नकाशा हॉलमध्ये भिंतीवर लावून आपण मुलांना देश ओळखण्याचा घरच्या घरी अभ्यास देऊ शकता, त्यामुळे भूगोल विषयाचा पाया भक्कम होऊ शकतो. मुलांवर संस्कार करण्याची माता व पिता या दोघांचीही समान जबाबदारी आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये स्पर्धात्मक युगात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी मुलांना शिक्षकघडवत असतात.

शाळेव्यतिरिक्त वेळचा सदुपयोग करून कला-क्रीडा यामध्ये मुलांनी प्राविण्य प्राप्त करून वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे असेही गोखले यांनी नमूद केले.

दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनचे समन्वयक विक्रम रेपे यांनी उपक्रमाचा उद्देश व्यक्त केला. 'गोमटेश' स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमानिमित्त विज्ञान विषयावरील रांगोळी, विविध प्रकारची चित्रे, माझी शाळा या विषयावरील निबंधांचे प्रदर्शन केले. उपक्रमास मुख्याध्यापिका ज्योती हरदी , दीपाली जोशी, नंदिनी पाटील, शोभा इंगळे, शाहिस्ता सय्यद ,महानंदा बक्कनावर, प्राची शहा , सुभाष इंगळे यांच्यासह पालक , शिक्षक ,विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली देशमाने यांनी केले.

'गोमटेश' अग्रगण्य शिक्षण संस्था

बेळगावसह निपाणी परिसरात गोमटेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक नामवंत विद्यार्थी घडत आहेत. पाठयपुस्तकासह कला-क्रीडा विषयात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. गुणवंत विद्यार्थी व प्रशिक्षित शिक्षक अशी ओळख असणाऱ्या 'गोमटेश इग्लिश मिडीयम स्कुल'चा परिसरातील अग्रगण्य शिक्षण संस्था असा नावलौकिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news