

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी आली आहे. या पार्श्वभूमीवर कपड्यांपासून विविध गृहोपयोगी वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. अशातच एकाच छताखाली दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब च्या वतीने शॉपिंग धमाका या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवनमधील कलादालनात मंगळवार, दि. 26 आणि बुधवार, दि. 27 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
प्रदर्शनात फॅशनेबल कपडे, अँटिक ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, मसाले, फराळाचे पदार्थ, चॉकलेट, गृहसजावटीच्या वस्तू, अशा अनेक वस्तूंचे स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये आपलाही स्टॉल बुक करण्यासाठी 8805007724, 8805024242 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. कोरोना नियंत्रणात असला, तरी दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब प्रदर्शनात होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेची सर्व काळजी आयोजकांनी घेतली आहे.