

पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रयाला व्यवसाय (prostitution) म्हणून नुकतीच कायदेशीर मान्यता दिल्याने देशभरातील सुमारे 28 लाख वारांगनांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आता 'सुप्रीम कवच' लाभले आहे.
सिक्कीममध्ये सर्वात कमी
सिक्कीममध्ये ही संख्या सर्वात कमी म्हणजे 425 अशी आहे. देशाचा विचार केला तर ही संख्या आहे 28 लाख 27 हजार 534. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अल्पवयीनांची संख्या 36 टक्के
यातील धक्कादायक बाब म्हणजे देहविक्रय (prostitution) करणार्यांच्या एकूण संख्येपैकी तब्बल 36 टक्के मुली अल्पवयीन आहेत. त्यांना फसवून किंवा त्यांच्यावर दडपण आणून या किळसवाण्या कामाला जुंपले जाते. अनेकदा यामागील मुख्य कारण गरिबी असते, असे दिसून आले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानंतर तयार केलेल्या अहवालानुसार देहविक्रय करणार्या महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 4 लाख 1 हजार 300 आहे.
भारतासह 53 देशांत मान्यता
जागतिक पातळीवर विचार केला तर आपल्या भारतासह जगातील एकूण 53 देशांनी देहविक्रयाला व्यवसाय म्हणून मान्यता दिली आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेत मात्र तेथील नेवाडा या राज्यानेच आपल्या प्रदेशापुरती अशी मान्यता दिली आहे. अन्य राज्यांमध्ये या विषयी अत्यंत कडक नियम बनवण्यात आले आहेत. तसेच चीन आणि सौदी अरेबियासह जगातील 35 देशांत देहविक्रय बेकायदा मानला जातो.