

नवी दिल्ली :
अनुपम खेर अभिनित 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरू आहे. डायरेक्टर विवेक रंजन अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटातील एक गाणे गाण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला होता. यासाठी त्या तयारही झाल्या होत्या. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.
विवेक रंजन अग्निहोत्री पुढे म्हणाले की, यामध्ये एकही गाणे नसले तरी हा चित्रपट नरसंहार पीडितांसाठी श्रद्धांजली आहे. आम्ही एका काश्मिरी गायकाचे एक लोकगीत रेकॉर्ड केले होते. हे गीत लतादिदी यांनी गावे अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी चित्रपट गाणी गायचे बंद केले होते. तरीही आम्ही त्यांना विनंती केली होती.