ड्रोन हल्ला : दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

दिल्लीमध्ये ड्रोन हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा सतर्क
दिल्लीमध्ये ड्रोन हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा सतर्क
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवल्यामुळे ५ ऑगस्टला येणाऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत पाकिस्तानी दहशतवादी दिल्लीत स्फोट करणार आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

गुप्तचर यंत्रणाने ड्रोन हल्ला होणार असल्याची माहिती दिल्यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय सीमा पार करून मानवी घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारतीय लष्कराने मोडून काढले आहेत.

त्यामुळे दहशतवाद्यांकडून आता ड्रोनचा वापर केला जात आहे. एअरबेसवरील हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात असे ड्रोन आढळले होते. त्यातील अनेक ड्रोनवर पोलिसांनी कारवाई केली होती.

मात्र, आता पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून त्यातून स्फोटकं पाठवण्याची तयारी दहशतवादी संघटनांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ५ ऑगस्टला दिल्लीत दहशतावादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांनी सर्व युनिट्सना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून ड्रोन हल्ल्याशी मुकाबला करण्याचं प्रशिक्षण मिळालेल्या टीम दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत.

दिल्लीत यंदा ४ अँटी ड्रोन सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी केवळ २ अँटी ड्रोन सिस्टिम लावण्यात आल्या होत्या. मात्र यंदा त्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

पोलिस आणि सैन्यातील काही जणांना ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये Soft Kill आणि Hard Kill असे दोन्ही प्रकार त्यांना शिकवण्यात आले आहेत.

एखादा संशयास्पद ड्रोन सीमेपलिकडून आपल्या हद्दीत येत असेल, तर त्याला तिथेच ब्लॉक कसं करावं, याचं वेगळं प्रशिक्षण, तर आपल्या भागातील एखाद्या संशयास्पद ड्रोनला नष्ट कसं करायचं, याचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यासाठी इंडियन एअरफोर्सच्या मुख्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरात आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news