ड्रॅगन – पाक संगनमत भारतासाठी धोकादायक!

ड्रॅगन – पाक संगनमत भारतासाठी धोकादायक!
Published on
Updated on

 भारताची सातत्याने डोकेदुखी ठरत असलेल्या चीनने सीमेवर पुन्हा एकदा आगळीक केल्यामुळे उभय देशांतील तणाव नव्याने वाढला आहे. तैवानची संशोधन संस्था डबल थिंक्स लॅब्सने 82 देशांवरील चीनच्या प्रभावाचा डेटाबेस तयार केला असून अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे. सर्वाधिक चिनी प्रभाव असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल आहे. चीन-पाकिस्तान यांचे घट्ट होत चाललेले पाश भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. कारण, भविष्यात चीन पाकिस्तानच्या भूमीवरूनही भारताला आव्हान देऊ शकतो, असे या माहितीवरून स्पष्ट होते.

चीनच्या प्रभावाखालील टॉप टेन देश

1) पाकिस्तान, 2) कंबोडिया, 3) सिंगापूर,
4) थायलंड, 5) दक्षिण आफ्रिका, 6) पेरू,
7) फिलिपाईन्स, 8) किर्गिझस्तान,
9) ताजिकिस्तान, 10) मलेशिया.

  पाकिस्तान चीनच्या विळख्यात

  • चीन-पाक व्यापारात 2007 ते 2015 या कालावधीत 278 टक्के वाढ
  • पायाभूत सुविधा क्षेत्रात चीनची पाकमध्ये 5 लाख कोटींची गुंतवणूक
  • कराची-पेशावर मार्गासाठी चीन 66 कोटी रुपये खर्च करणार

2022 पर्यंत चीनने पाकमध्ये उभारलेले मोठे प्रकल्प

  • पाकिस्तान-चीन फ्रेंडशिप हॉस्पिटल, पाक-चीन तांत्रिक व्यावसायिक संस्था, ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ग्वादर पूर्व द्रुतगती मार्ग, खुजदार-बसमी रोड, हाकला-डीआय खान मोटरवे, 884 मेगावॉट किनारी विद्युत प्रकल्प आणि 330 मेगावॉट थालनोवा कोळसा ऊर्जा प्रकल्प.
  •  चीनला भारताशी समोरासमोर संघर्ष नको असल्यामुळेच ड्रॅगनने आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. सिल्क रूट, पाकिस्तान चायना कॉरिडॉर ही भारतासाठी भविष्यातील धोक्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news