डोकेदुखी नेमकी कशामुळे होते? जाणून घ्या अधिक

डोकेदुखी
डोकेदुखी
Published on
Updated on

डोकेदुखी हा सार्वजनिक त्रास असून त्यामुळे अनेकजण दिवसभर अस्वस्थ राहतात. बहुतांश प्रकरणात डोकेदुखी आपोआप कमी होते; परंतु काहीवेळा गंभीर स्थितीत डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी डोकेदुखी ही कालांतराने गंभीर आजाराचे रूपदेखील धारण करू शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे हे अधिक अडचणीचे ठरते.

मायग्रेन किंवा क्लस्टर हेडेक : मानसिक त्रास किंवा तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूप दुखते. यास अर्धशिशी म्हणतात. मायग्रेनच्या डोकेदुखीत उलटी किंवा मळमळदेखील होते. आपली झोप डोकेदुखीमुळे उडत असेल, तर आपल्याला क्लस्टर हेडेक होऊ शकतो. मायग्रेनप्रमाणेच यातही एकाच बाजूचे डोके दुखते. क्लस्टर हेडेकचा त्रास हा 20 ते 50 वयोगटातील लोकांना होतो. याशिवाय उच्च रक्‍तदाब, स्लिप अ‍ॅपनिया आणि ब्रेन ट्यूमरमुळेही डोकेदुखी होऊ शकते.

ताप किंवा मान आखडल्याने डोकेदुखी : ताप आणि मान आखडल्यानेदेखील डोकेदुखी होते. या गोष्टी इन्सेफेलायटिस किंवा मेनिन्जाटिसचे संकेत देणार्‍यादेखील असू शकतात. इन्सेफेलायटिसमध्ये मेंदूत, तर मेनिन्जायटिसमध्ये मेंब्रेनमध्ये सूज येते. गंभीर संसर्गात अशा प्रकारची डोकेदुखी ही जीवघेणी ठरू शकते. कमकुवत इम्यून सिस्टिम किंवा मधुमेहासारख्या आजारपणातही ही धोकादायक ठरू शकते. अँटिबायोटिक औषधांच्या मदतीने तत्काळ उपचार करता येतो.

थंडरक्लॅप डोकेदुखी : थंडरक्लॅप डोकेदुखी ही अचानक आणि खूप होते. 60 सेंकदांपेक्षा किंवा त्यापेक्षा कमी काळातही हे दुखणे सुरू होते. नस तुटल्याने, स्ट्रोक किंवा मार लागल्याने मेंदूत रक्‍तस्त्राव होतो आणि थंडरक्लॅप डोकेदुखी होऊ लागते. याप्रमाणे डोकेदुखी ही डोक्याच्या कोणत्याही भागाला होऊ शकते. मानेपासून पाठीपर्यंत ती वाढू शकते. हे दुखणे एक तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ राहू शकते. याशिवाय चक्कर येणे, मळमळ करणे, बेशुद्ध होणे यासारखे लक्षणेदेखील दिसू लागतात. हायपरटेन्शमुळे देखील दुखणे बळावते.
मार लागल्यानंतरची डोकेदुखी : डोक्याला मार लागल्याने दुखणे वाढत जाते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. डोक्यावर पडल्याने लागणारा किरकोळ मार देखील मेंदूूत रक्‍तस्त्राव होण्यास कारणीभूत ठरतो आणि काहीवेळा तो जीवघेणे ठरू शकतो.

डोळ्यांवरील ताणामुळे होणारी डोकेदुखी : काहीवेळा डोळ्यांमुळेही डोकेदुखी होऊ शकते. आपल्याला नेहमीच मायग्रेनचा त्रास राहत असेल, तर डोळ्याची शक्‍ती कमी होऊ शकते. डोकेदुखीबरोबरच डोळ्यांसमोर धुरकटपणा येत असेल, तर डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क करा. डोळ्यांतील रेटिनात गडबड होऊ शकते.

डोकेदुखीची सामान्य कारणे : या लक्षणांव्यतिरिक्‍त डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. जागेत बदल, व्यक्‍तिमत्त्वात बदल, वयाची पन्‍नाशी ओलांडल्यानंतर काही शारीरिक बदल किंवा अशक्‍तपणा, मोनोपॉजच्या स्थितीतून जाणार्‍या महिला आदी एकप्रकारे डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जातात.

डोकेदुखीचे संकेत : डोकेदुखीतून काही वेळा संकेतदेखील मिळतात. जसे की, ज्या लोकांना खूप कॉफी पिण्याची सवय असते, त्यांना कॅफिन न मिळाल्यास डोकेदुखी होऊ लागते. याशिवाय डिहायड्रेशन किंवा खूप मद्यपान करणे यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. स्मोकिंग सोडतानादेखील निकोटिन थांबवल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. झोप पूर्ण न होणे, गरजेपेक्षा अधिक फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटी यामुळेदेखील डोकेदुखी होऊ लागते. याप्रकारच्या डोकेदुखीत कोणत्याही मेडिकल हेल्पची गरज नसते. केवळ आराम केल्याने हा त्रास कमी होतो.

सामान्य डोकेदुखी ही कोणत्याही पेन किलरने कमी होते. परंतु, डोके आणखी दुखत असेल आणि आणखी काही लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डॉ. संजय गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news