टी-20 क्रमवारीत ईशान किशन ‘टॉप 10’मध्ये

टी-20 क्रमवारीत ईशान किशन ‘टॉप 10’मध्ये

Published on

दुबई : वृत्तसंस्था; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाच टी-सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करत असलेल्या भारताचा सलामीवीर ईशान किशनने आयसीसीने जारी केलेल्या टी-20 क्रमवारीत 'टॉप 10'मध्ये मुसंडी मारली आहे. शानदार फलंदाजीच्या बळावर ईशानने 68 स्थानांची सुधारणा करत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ईशान आपल्या कारकिर्दीत प्रथमच 'टॉप 10'मध्ये दाखल झाला.दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी ईशान 76 व्या स्थानी होता.

मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांत त्याने 164 धावा काढल्या आहेत. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी करणारा इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. वनडे क्रमवारीत पाकच्या फलंदाजांचा दबदबा आहे. पहिल्या स्थानावर पाकचा कर्णधार बाबर आझम असून, दुसर्‍या स्थानावर इमाम उल हक आहे. इमामने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कोहली आता तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे, तर रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. दरम्यान, कसोटी क्रमवारीत रोहित शर्मा आठव्या, तर विराट कोहली 10 व्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news