‘झोंबिवली’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, २६ जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

‘झोंबिवली’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, २६ जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
Published on
Updated on

मुंबई : अमेय वाघचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'झोंबिवली'ची मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. 'झोंबिवली' या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २६ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी यांनी मुख्य भूमिका साकारली आहेत.

हॉरर-कॉमेडी अशा 'झोंबिवली' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र चित्रपटाची चर्चा रंगली होती. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती. या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amey wagh (@ameyzone)

डोंबिवलीमध्ये कशाप्रकारे झोंबींची एंट्री होते आणि मग हळूहळू बऱ्याच थरारक गोष्टी कशाप्रकारे घडत जातात हे, या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा 'झोंबिवली' सिनेमाचा ट्रेलर आहे. ट्रेलमधील काही सीन भीतीदायक वाटतात तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by amey wagh (@ameyzone)

या सिनेमाची गेले अनेक दिवस प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. "आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी! २६ जानेवारीला येतोय करून सगळी तयारी", अशी पोस्ट अमेय वाघने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोंबी मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून हा चित्रपट आता फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news