

न्यूयॉर्क : अमेरिकेतील जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांशी विवाह केला. या दोघींना एकाच वेळी गर्भधारणाही झाली. त्यांची मुलं ही एकमेकांची केवळ चुलत भाऊच नाहीत तर त्यांचे डीएनए एकच आहेत, असे दिसून आले आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील 35 वर्षांच्या ब्रियाना आणि ब्रिटनी डीन या जुळ्या बहिणींचा जोश आणि जेरेमी सॅलियर्स या जुळ्या भावांशी विवाह झाला. या दोन्ही जोडप्यांना जॅक्स आणि जेट ही मुलं आहेत. या दोन्ही मुलांच्या वयात फक्त तीन महिन्यांचे अंतर आहे. जेटचा जन्म जानेवारीत झाला तर जॅक्सचा एप्रिलमध्ये. हे दोघे एकमेकांचे 'क्वॉटरनरी ट्विन्स' आहेत.
याचा अर्थ दोघे चुलत भाऊ असूनही त्यांचा डीएनए समान आहे. या कुटुंबाने त्यांच्या संयुक्त इन्स्टाग्राम पेजवर याविषयी खुलासा करून त्यांच्या 2,19,000 फॉलोअर्सना ही माहिती दिली आहे. 'क्वॉटरनरी ट्विन्स' ही एक शास्त्रीय संकल्पना आहे. यानुसार दोन मुलांचे जन्मदाते आई-वडील वेगवेगळे असतात. मात्र, ते एकाच आई-वडिलांकडून जन्मलेल्या भावंडांसारखे असतात.