

भाजपच्या वतीने आज (सोमवार) जळगाव येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ पोहोचला असता, आ गिरीश महाजन यांचे भाषण सुरू होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांना भोवळ आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आला. यावेळी आमदार गिरीश महाजन मार्गदर्शन करीत होते. या दरम्यान ट्रॅक्टरवर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांना भोवळ आली. त्यांना तात्काळ डॉक्टर राहुल महाजन यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.