जयप्रभा स्टुडिओ विक्री प्रकरण : स्टुडिओची जागा शासनाला देण्याची सशर्त तयारी

जयप्रभा स्टुडिओ विक्री प्रकरण : स्टुडिओची जागा शासनाला देण्याची सशर्त तयारी
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : लता मंगेशकर यांचे कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेत स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. मात्र; जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याने या स्टुडिओवरची मंगेशकर कुटुंबीयांची मालकी संपुष्टात आली. आता त्यांचे स्मारक कुठे करायचे हा प्रश्‍न आहे. दरम्यान, त्यांनी आपल्याला शासकीय नियमानुसार पर्यायी जागा दिल्यास स्टुडिओची जागा महापालिकेस हस्तांतर करू, असे ज्यांनी ही जागा घेतली आहे, त्या श्री महालक्ष्मी स्टुडिओज, एलएलपी यांनी तसे पत्र महापालिका प्रशासकांना दिले आहे.

श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या खासगी भागीदारी फर्मने 6 कोटी 50 लाखांना हा स्टुडिओ विकत घेतला आहे. कोल्हापूरकर स्टुडिओसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, त्यांना अंधारात ठेवून, कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा घेत स्टुडिओ घशात घातल्याच्या भावना कोल्हापूरकरांकडून व्यक्‍त केल्या जात आहेत. छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी 1947 मध्ये जयप्रभा स्टुडिओची जागा रायबा चाळके यांना दिली होती.

चित्रमहर्षि भालजी पेंढारकर यांनी पत्नी लिलाबाई पेंढारकर यांच्या नावे ही जागा विकत घेतली. पुढे आर्थिक अडचणींमुळे भालजींनी 1960 साली हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना 60 हजार रुपयांना विकला. यानंतर 2008 साली लता मंगेशकर यांनी या स्टुडिओपैकी काही भाग विकेश ओसवाल यांना विकला. यानंतर जयप्रभा स्टुडिओचे विभाजन करून परिसरातील जागा हळूहळू विकण्यात आली.

कोल्हापूर महापालिकेच्या हेरीटेज वास्तूंच्या यादीत नोंद असलेला हा स्टुडिओच आता विकला गेला आहे. स्टुडिओची 12 हजार 122 चौरस मीटर जागा 15 फेब्रुवारी 2020 रोजी विकण्यात आली. मालमत्ता पत्रकावर त्याची 3 जुलै 2020 रोजी नोंद झाली असून तेव्हापासून मंगेशकर कुटुंबीयांची या स्टुडिओची मालकी संपुष्टात आली आहे. जयप्रभा या ऐतिहासिक वास्तुला धोका उत्पन्‍न होईल, असे कोणतेही कृत्य केले नसल्याचेही महालक्ष्मी स्टुडिओने म्हटले आहे.

मुलांच्या व्यवहाराची माहिती नाही : राजेश क्षीरसागर

स्टुडिओची जागा शासनाने घ्यावी यासाठी पाठपुरावा करू. निवडणुकीच्या तोंडावर आपल्या राजकीय बदनामीचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. मुलांच्या व्यवहाराबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचेही ते म्हणाले.

जयप्रभा स्टुडिओचे मालक

जयप्रभा स्टुडिओ खरेदी केेलेल्या श्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी या संस्थेचे दहा भागीदार आहेत. श्रीकांत राऊत हे वटमुखत्यार असून त्यासह महेश अमृतलाल बाफना-ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा-संघवी, राजू रोखडे, रौनक पोपटलाल शहा-संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर व आदिनाथ शेट्टी यांचा समावेश आहे. हे दहा जण आता जयप्रभा स्टुडिओचे मालक असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news