

बीजिंग ; वृत्तसंस्था : चीनकडून पाकिस्तानला लष्करी मदत पुरविली जाणे, ही काही नवी बाब नाही. लडाख सीमेवर भारतासोबत तणावाची स्थिती उद्भवल्यानंतरच्या काळात तर पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचा चीनने सपाटाच लावला आहे. आता चीनकडून अत्याधुनिक युद्धनौका देण्यात येणार आहेत.
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. लष्करी क्षेत्रासह विविध आघाड्यांवर एकमेकांना मदत करत आलेले आहेत. नुकतीच चीनने 'जेएफ-17' हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करण्यात पाकिस्तानला मदत देऊन झाली आहे.
'जेएफ-17' हे पाकिस्तानी हवाई दलातील अत्यंत महत्त्वाचे लढाऊ विमान सध्या आहे. लढाऊ विमानानंतर आता 'स्टेल्थ फ्रिगेट टाईप 054' ही अत्याधुनिक लढाऊ नौका चीनकडून पाकिस्तानला दिली जाणार आहे.
पहिली युद्धनौका येत्या काही दिवसांतच पाकच्या हवाली केली जाईल. आगामी 3 वर्षांत 3 युद्धनौका क्रमश: पाकला देण्यात येणार आहेत.