कोल्हापूर : हेडफोन, इयरफोनमुळे कानाचे आजार वाढले

कोल्हापूर : हेडफोन, इयरफोनमुळे कानाचे आजार वाढले
Published on
Updated on

कोल्हापूर, एकनाथ नाईक : तुमचा हेडफोन, इयरफोन आजारांना निमंत्रण देतोय, असं सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हेडफोन, इयरफोनच्या सततच्या वापरामुळे कानाचे आजार वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. हेडफोन, इयरफोनच्या वापरामुळे कानाच्या आजारांनी रुग्णालयात येणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्क फ्रॉम होम करताना हेडफोन, इयरफोनचा सतत वापर घातक ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. सीपीआरचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अजित लोकरे यांनी शाळा-कॉलेजमधील मुले सर्वात जास्त कानासंबंधी आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात येत असल्याचे सांगितले.

सतत हेडफोन वापरणे धोक्याचे

तज्ज्ञांच्या मते हेडफोन किंवा इयरफोनचा आवाज मोठा असेल तर कानाच्या पडद्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अर्धा तास सलग हेडफोन, इयरफोन वापरल्यास 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यामुळे कानाला विश्रांती मिळेल आणि त्रास कमी होईल.

कानांची क्षमता

व्यक्ती 85 डेसिबलपर्यंचा आवाज आठ तासांसाठी किंवा 100 डेसिबलचा आवाज 15 मिनिटांसाठी सहन करू शकते. यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास बहिरेपणा येऊ शकतो. एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा 60 डेसिबल असतो. हेडफोनमुळे कानावर 105 डेसिबल आवाज पडत असतो.

…हे टाळा

कानात काडी, टोकदार वस्तू, पेन किंवा चावी अशा वस्तू घालू नये. कानात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. अतिआवाजाच्या ठिकाणी कानांमध्ये कापसाच्या बोळ्याचा वापर करावा.

काळजी घ्यावी

मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णाला कानाचे आजार झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. हेडफोन, इयरफोनचा सततचा वापर रुग्णांना बहिरेपणा आणि चक्कर येत असल्याचे दिसून आले आहे, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news