

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवारी सुरू झाली. आता मोर्चेबांधणीला वेग येणार असून थेट सरपंचपदासाठीही निवडणूक होणार असून, महिनाभर जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे. इच्छुकांची चाचपणी सुरू झाली असून अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या होणार आहेत.
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील मुदत संपलेल्या 49 ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. बांबवडे, सरूड, पिशवी, साळशी कडवे, कापशी, भेडसगाव, रेठरे, चरण, शाहूवाडी, कोतोली या मोठ्या गावांबरोबर अन्य छोट्या गावांमध्ये या निवडणुका चुरशीने होणार असून स्थानिक व तालुका नेत्यांनी वर्चस्वासाटी कंबर कसली आहे.