कोल्हापूर : ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो’ची यशस्वी सांगता

कोल्हापूर : ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो’ची यशस्वी सांगता
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील ग्राहकांना घरांचे आणि कमर्शियल प्रॉपर्टींचे भरपूर पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023'ची सोमवारी यशस्वी सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात प्रॉपर्टींच्या विविध पर्यायांची माहिती घेण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. बांधकाम व्यावसायिकांकडे शेकडो लोकांनी प्रॉपर्टी खरेदीसाठी स्वारस्य दाखवले आहे.

या एक्स्पोमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांकडे फ्लॅट आणि प्लॉटस्चे बुकिंग झाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक्स्पोमधून झालेल्या इन्क्वॉयरीद्वारे अनेक व्यवहार प्रत्यक्षात येतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक व्यक्त करत आहेत. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. समारोपप्रसंगी सर्व सहभागी बांधकाम व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांना दैनिक 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनात ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेकांनी सहकुटुंब प्रदर्शनाला भेट देऊन घरांच्या विविध पर्यायांची माहिती घेतली. आयकॉन स्टील हे 'पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो'चे मुख्य प्रायोजक होते.

या प्रदर्शनात कोल्हापूर आणि परिसरातील बांधकाम प्रकल्पांचे प्रवर्तक, बांधकाम व्यावसायिक, विकासक, तसेच गृह कर्ज पुरवठादार बँका आणि इतर वित्तीय संस्था तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित पुरवठादार यांचे स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध होते. त्यामध्ये घाटगे डेव्हलपमेंटस्, बेडेकर लाईफस्पेसेस, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, की वेस्ट प्रॉपर्टीज, विश्वकर्मा गृहनिर्माण, अ‍ॅस्टिन इंडिया प्रा. लि., श्री डेव्हलपर्स, लाईफस्टाईल डेव्हलपर्स, ज्योतिवीर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बसव ज्योती हाईटस्, आविष्कार इन्फ्रा, कंस्ट्रो कन्सल्टन्सी या व्यावसायिकांच्या गृह आणि व्यापारी प्रकल्पांमध्ये ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने विचारणा केल्या आहेत. रेटिना आणि सिक्युअरअन्स यांचा सुरक्षाविषयक इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्चा स्टॉलदेखील लक्षवेधी ठरला. 'अर्बन रूफ' यांचे मुव्हेबल घरदेखील ग्राहकांना आकर्षित करून घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news