कोल्हापूर : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ला प्रतिसाद

कोल्हापूर : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ला प्रतिसाद
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स-2022' प्रदर्शनास ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. देश-विदेशातील पर्यटनासंदर्भातील माहिती एकाच छताखाली मिळाल्याने अनेकांनी पर्यटनाचे प्लॅनिंग निश्चित केले. काहींनी ऑन दि स्पॉट सहलीचे बुकिंग करून कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला.

दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स-2022' प्रदर्शनास हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये शनिवारी प्रारंभ झाला. 'गगन टूर्स' प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक 'अ हेवन हॉलिडेज' आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटन अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. प्रदर्शन सुरू झाल्यापासून ग्राहकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी कुटुंबासह प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. देश-विदेशातील पर्यटनाची ठिकाणे, तेथील प्रेक्षणीय स्पॉट, उपलब्ध सुविधा याची माहिती घेण्यात ग्राहक गुंतले होते.

सायंकाळी सहानंतर गर्दीचा ओघ वाढला. प्रदर्शनातील स्टॉलला भेट देणार्‍या प्रत्येक ग्राहकाचे स्टॉलवरील प्रतिनिधी स्वागत करीत होते. त्याचबरोबर माहिती पुस्तिका, पत्रके देऊन ग्राहकांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनात सहभागी कंपन्यांनी डोमेस्टिकसह इंटरनॅशनल पर्यटनाचे दालन खुले केले आहे. शाळा, महाविद्यालये, महिला मंडळ, सरकारी कर्मचारी संघटना, विविध क्लब, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बजेटमधील सहलींचे पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. सहलींवर विविध सवलती आणि डिस्काऊंट ऑफर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटनाची इत्यंभूत माहिती देणारे प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.

'भावभक्तीचा, गंध सुरांचा' मैफलीचे पास उपलब्ध

दै.'पुढारी' आयोजित सायकल अगरबत्ती प्रस्तुत 'भाव भक्तीचा, गंध सुरांचा' मैफलीचे 25 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. 'कितीदा नव्याने तुला आठवावे' फेम संगीतकार व गायक मंदार आपटे व 'टिकटिक वाजते' फेम सायली पंकज हे मैफलीत विविध गीतांचा नजराणा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका हॉटेल पॅव्हेलियन येथे दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स' प्रदर्शनस्थळी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत मिळतील. अधिक माहितीसाठी 9404077990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

'दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स' प्रदर्शनाला दोन दिवसांत हजारो पर्यटनप्रेमी, नागरिकांनी भेट देऊन आपल्या आवडत्या ठिकाणी सहलीला जाण्यासाठीचे बुकिंग केले आहे. ग्राहकांकडून चौकशीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. सोमवारी (दि.22) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. करवीरवासीयांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news