

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती गंभीर बनली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर पाणी आले आहे. सांगली फाटा, तावडे हॉटेल, शिये येथे महामार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे काल शुक्रवारपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी २४ जुलै २०२१ पर्यंत जिल्ह्यातील बंद व सुरू असलेल्या मार्गांबाबत एक माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी : बंद आहे
कोल्हापूर ते पुणे (एनएच ४) : बंद आहे
कोल्हापूर ते सांगली : बंद आहे
कोल्हापूर ते बेळगाव : बंद आहे
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग/गोवा : बंद आहे
कोल्हापूर-हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, शिरोळ : बंद आहे
कोल्हापूर ते गांधीनगर (उचगाव मार्गे) : चालू आहे
कोल्हापूर ते कागल : चालू आहे
कोल्हापूर ते गारगोटी दुधगंगा कारखान्याजवळ : बंद आहे
कोल्हापूर राधानगरी : बंद आहे
कोल्हापूर ते गगनबावडा : बंद आहे
कोल्हापूर ते गगनबावडा (दोनवडे, कळे, मांडूकली, या ठिकाणी बंद आहे : बंद आहे
कोल्हापूर ते पन्हाळा, शाहूवाडी, आंबा : बंद आहे