कोल्हापुरात वेश्या व्यवसायासाठी मुलीची विक्री; चौघांना सक्तमजुरी

कोल्हापुरात वेश्या व्यवसायासाठी मुलीची विक्री; चौघांना सक्तमजुरी
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात आणणार्‍या तसेच एका मुलीची विक्री करणार्‍या टोळीला न्यायालयाने दोषी ठरवून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पुण्यात डी.जे. ऑपरेटिंगचे शिक्षण घेणार्‍या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरी मुलगी वडिलांच्या आजारपणामुळे यामध्ये ओढली गेल्याचे कारण समोर आले आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी सरिता रणजित पाटील (वय 41, रा. पाचगाव, करवीर), मनीषा प्रकाश कट्टे (30, रा. भोसलेवाडी, कोल्हापूर), विवेक शंकर दिंडे (31, रा. राजारामपुरी) या तिघांना 10 वर्षे सक्तमजुरी व 29 हजार रुपये दंड ठोठावला, तर वैभव सतीश तावसकर (28, रा. पांगरी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्तमजुरी व 4 हजारांचा दंड ठोठावला आहे.

सरिता पाटील ही कळंबा येथील महालक्ष्मी निवास अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवत होती. तर विवेक दिंडे व वैभव तावसकर हे गरजू व असहाय महिलांना वेश्या व्यवसायासाठी सरिता पाटीलकडे घेऊन येत होते. 2019 मध्ये करवीर पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती.

नेपाळी मुलीची विक्री

पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित मुलींपैकी एक मुलगी ही नेपाळची आहे. ती पुण्यामध्ये डी.जे. ऑपरेटिंगचे शिक्षण घेत होती. तिची मोठी बहीण कोल्हापूरमध्ये राहत होती. 2019 मध्ये फ्रेंडशिप डेनिमित्त एका पार्टीसाठी ती कोल्हापुरात आली होती. मेकअपसाठी ती ताराबाई पार्कातील पार्लरमध्ये गेली असता आरोपी मनीषा कट्टे हिने 'तू दिसायला छान आहेस, तुला जॉबपेक्षा जास्त पैसे मिळतील,' असे आमिष दाखवले. तिथून तिला पाचगाव येथील बंगल्यात नेऊन आरोपी सरिताची ओळख करून दिली. त्यानंतर तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. मनीषाने तिची सरिता पाटीलला विक्री केल्याचे तपासात समोर आले.

वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा

दुसरी पीडित ही अत्यंत गरीब घरातील आहे. तिचे वडील नेहमी आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारामुळे तिला अडचणी होत्या. तीदेखील पार्लरच्या माध्यमातून आली असता सरिता पाटील हिच्याशी ओळख झाली. सरिता पाटील आणि विवेक दिंडे या दोघांनी तिला कळंबा येथील फ्लॅटवर नेऊन वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले.

या खटल्यात सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दोन्ही पीडित मुलींसह एकूण अकरा साक्षीदार तपासले. या दोन्ही मुलींची साक्ष, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सागर पोवार, माधवी घोडके, अ‍ॅड. वंदना चिवटे यांनी सरकारी पक्षाला मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news