

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अलीकडेच YONO बँकिंग ॲप्लिकेशनशी संबंधित नियम बदलले आहेत.
जर तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि YONO ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे आणि त्याचा मोठा ग्राहक वर्ग आहे.
देशातील फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये एसबीआय आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सुरक्षा देऊ इच्छित आहे. यासह, ग्राहकांना चांगला आणि सुरक्षित बँकिंग अनुभव मिळेल.
YONO ॲप वापरणाऱ्या SBI ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता लक्षात घेऊन कठोर नियम बनवण्यात आले आहेत. या YONO ॲपमध्ये, तुम्ही फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लॉग इन करू शकाल, तुम्ही इतर कोणत्याही पर्यायी नंबरने लॉग इन करू शकणार नाही. जर SBI खातेधारक इतर कोणत्याही क्रमांकावर लॉग इन करत असतील तर त्यांना व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय, ज्या फोनमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचे सिम असेल त्याच फोनवरून तुम्ही लॉग इन करू शकाल. आपण इतर कोणत्याही फोनवरून आपल्या अॅपमध्ये लॉग इन करू शकणार नाही.
एसबीआय ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनच्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरला जाऊन, आताचे YONO अपडेट करावे लागणार आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवीन नियमांविषयीची माहिती दिली आहे. यात YONO लाइट डाउनलोड करू शकता. हे सुरक्षित आहे अस म्हटलं आहे.
देशात मार्च २०२० मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहार वाढले. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली. यानंतर एसबीआयने YONO अॅप मध्ये सुरक्षा संबंधी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.