उजनीवर ‘गॉडविट’ पक्ष्यांची मांदियाळी

उजनीवर ‘गॉडविट’ पक्ष्यांची मांदियाळी
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय द्वीपकल्पात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी म्हणून दाखल होणारे गॉडविट विलायती पक्षी सध्या उजनी जलाशयाच्या विस्तृत पाणी फुगवठ्यावर दाखल झाले आहेत. सामान्यपणे आठ दिवसांत सलग 11 हजार किलोमीटर प्रवास करून आले आहेत. ते समूहाने वावरताना दिसत आहेत.

पाणटिवळा या नावाने परिचित असलेले हे जलचर पक्षी उत्तर युरोप, आलास्का व पॉलिआर्टिक तसेच सैबेरिया या ठिकाणी मूळ वास्तव्याला असतात. दरवर्षी हे विदेशी पक्षी थंडीची सुरुवात झाल्यावर न्यूझीलंडकडे स्थलांतर होतात व त्याचवेळी अनेक पक्षी भारतीय उपखंडात उन्हाळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत दलदली व सरोवरे गाठून हिवाळी पाहुणे म्हणून तळ ठोकून राहतात.

आकाराने टिटवी एवढा असलेला हा पक्षी बदामी रंगाचा असतो. या पक्ष्यांच्या पंखांवर चित्रविचित्र रंगाचे ठिपके असतात. जलचर असलेल्या पक्ष्यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण असून ती बारीक, सरळ व किंचित वरच्या बाजूला वाकलेली असते व तिचा उपयोग चिखलात खोलपर्यंत बुडवून जलकीटकांना टिपण्यासाठी होतो. मृदुकाय प्राणी व खेकडे यांच्यावरही हे पक्षी उदरनिर्वाह चालवतात. हे पक्षी एकट्याने किंवा मोठ्या थव्याने आढळून येतात.

हे पक्षी स्थलांतर करून भारतात आल्यानंतर समुद्रकिनारे, दलदली क्षेत्रे व अनेकदा भात शेतात आपले बिर्‍हाड टाकतात. या पक्ष्यांची वैशिष्ट्येम्हणजे ते तब्बल आठ ते दहा दिवस न थांबता न खाता-पिता उडत असतात. या मॅराथॉन उड्डाणात हे पक्षी अन्य पक्ष्यांच्या तुलनेत खूपच कमी ऊर्जा खर्च करत असतात. सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात हे पक्षी ठराविक गट तयार करून सामूहिक उड्डाण घेत आपल्या मूळ स्थानी परतीच्या प्रवासाला निघतात.

यावर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हे पक्षी महिनाभर उशिरा येऊन दाखल झाले आहेत. विमानाचे आतापर्यंत दीर्घ उड्डाण साडेतीन दिवसांची नोंद आहे तर हे पक्षी पाणटिवळे पक्ष्यांच्या सलग आठ ते दहा तास उड्डाणाचा विचार केला तर पक्षी जगतातील हे एक विस्मयकारक घटना म्हणून गणना करता येईल.

-डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी संशोधक व पर्यावरण अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news