

तेहरान; वृत्तसंस्था : इराणमध्ये हिजाब- बुरख्याविरोधातील निदर्शनांत आतापर्यंत ६० हून अधिक बालकांचा बळी गेला आहे. या मुलांचे वय १८ वर्षांहून कमी होते. मृतांमध्ये १२ अल्पवयीन मुली व ४६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. देशातील एका मानवाधिकार संघटनेच्या माहितीनुसार आतापर्यंत पोलिसांनी २०० अल्पवयीनांना अटक केली आहे.
एका खुनाच्या प्रकरणात इराणने ३ अल्पवयीनांना आरोपी घोषित केले आहे. या तिघांसह इतरांवर तेहरानमधील एका पोलिस अधिकाऱ्याला ठार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इराणमध्ये अशा गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. विशेष म्हणजे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या कोर्टात चालवले जात आहे. तिन्ही अल्पवयींनांविरोदात तेहरानच्या कराजमध्ये सुनावणी झाली.