

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या उत्साहात मार्गस्थ होणार आहे. यंदा आळंदी येथून 21 जून रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. त्यात वरील नियोजन करण्यात आले आहे. यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. दिंडीकर्यांच्या मागणीवरून संस्थानच्या सही-शिक्क्याने यंदा वाहन पास देण्यात येणार आहे.
आळंदी येथून मंगळवार, 21 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल.