

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रियेस शुक्रवार (दि. 17) पासून प्रारंभ होणार आहे.
आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ होण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने स्कूल कनेक्ट उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुकानिहाय शाळांमध्ये जाऊन दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांना आयटीआयनंतरची रोजगार संधी, कौशल्य, शिष्यवृत्ती योजना याची माहिती देण्यात येत आहे. सध्या उद्योगांना प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासत आहे. आयटीआय करणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठीचा पर्याय खुला झाला आहे.
यंदाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कळंबा रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील शासकीय, खासगी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. कोल्हापुरातील शासकीय आयटीआयमध्ये टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल अँड डायमेकर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशनर, मॅकेनिक मोटार व्हेईकल आदी 31 ट्रेडसाठी सुमारे 1364 जागा उपलब्ध आहेत. दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती हीींिं://रवाळीीळेप.र्वींशीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, असे शासकीय आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी सांगितले.
आयटीआय प्रवेश वेळापत्रक…
ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती -17 जूनपासून सुरू
अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करणे – 22 जून
पहिल्या फेरीसाठी विकल्प, प्राधान्यक्रम सादर करणे- 22 जून