आयआयटी मुंबई च्या विद्यार्थ्यांना भरघोस मिळाले पॅकेज !

आयआयटी मुंबई च्या विद्यार्थ्यांना भरघोस मिळाले पॅकेज !
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृतसेवा : आयआयटी मुंबई मध्ये झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी 62 लाखाची, तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून 2.74 लाख अमेरिकन डॉलरची ऑफर मिळाली आहे.

आयआयटी मुंबई च्या पवई कॅम्पसमध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सुरूवात झाली आहे. बुधवारी प्लेसमेंटमध्ये तब्बल 28कंपन्यांनी सहभाग घेतला. प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. लाखो रुपये मिळकतीची नोकरी मिळाली आहे.

मिलेनियमकडून स्थानिक ऑफर्समध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 62 लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर वर्ल्डक्वांटकडून 51.71 लाखांचे तर ब्लॅकस्टोनकडून 46. 62 लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्ये उबेर आणि रुब्रिक अशा कंपन्यांकडून ऑफर्स आल्याची माहिती सेलकडून देण्यात आली.

रिक्रुटर्स कंपन्यांकडून आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग या क्षेत्रातील ऑफर्समध्ये प्राधान्य दिले आहे.अजून काही दिवस चालणार्‍या या प्लेसमेंट मध्ये आयआयटीअन्स कोट्यवधीची उड्डाणे घ्यायला तयार आहेत. प्री प्लेसमेंट ऑफर्समध्येही जास्त पॅकेज मिळवणार्‍या व त्या ऑफर्स मान्य करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. बुधवारी पॅकेज देणार्‍या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इंस्टुरमेंट, क्वॉलकम, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप, अशा कंपन्यांचा समावेश होता. 201 प्री प्लेसमेंट्स ऑफर्स आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून स्वीकारण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.

देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांनी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना लाखोच्या पॅकेजची ऑफर देऊ केली आहे.

देशातील ऑफर कंपनी पॅकेज

  • मिलिनियम   62.00 लाख, वार्षिक
  • वर्ल्डकाऊंट  51.71 लाख, वार्षिक
  • ब्लॅकस्टोन    46.62 लाख, वार्षिक

आंतरराष्ट्रीय ऑफर कंपनी पॅकेज

  • उबेर       2.74 लाख-युएसडी, वार्षिक
  • रब्रीक      1.21 लाख- युएसडी, वार्षिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news