

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आम्हाला घाबरवण्यासाठी कोर्टात जाण्याची आणि अपात्र ठरवण्याची भाषा केली जात आहे. मात्र या दबावला आम्ही बळी पडणार नाही. उद्या मतदानाला येऊ आणि उद्याच सरकार पडलेले असेल असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.
आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कालपर्यंत संधी दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडण्यासाठी आम्ही वाट पाहिली. मात्र, त्यांनी निर्णय घेतला नाही, त्यामुळे नाईलाजाने एकनाथ शिंदे यांना अन्य पर्यायांचा विचार करावा लागला. आता आम्ही माघारी फिरू शकत नाही, असे केसरकर यांनी सांगितले.
आम्हाला अपात्र ठरवण्याची सरकारची कारवाई ही चुकीची आणि बेकायदेशीर आहे. जर अपात्रच करायचे होते तर सर्वच आमदारांना नोटीस देणे आवश्यक होते; पण काही जणांनांच नोटीसा देण्यात आल्या, असा आरोप केसरकर यांनी केला.
हेही वाचा