

जशपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील जशपूरमध्ये एका विवाह सोहळ्यातून 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना रविवारी समोर आली. पीडितेला बेदम मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पंडरापाठ ठाणे हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलगी 17 फेब्रुवारी रोजी रात्री एका विवाह सोहळ्यात सहभागी झाली होती. तेथे पाच तरुणांनी तिचे अपहरण केले. नंतर जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी तिला मारहाणही केली. जखमी अवस्थेत ती गावात पोहोचल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेवर तीन वर्षापूर्वीही अत्याचार करण्यात आला होता. मात्र भीतीपोटी त्याची वाच्यता केली नसल्याची माहिती पीडितेच्या मैत्रिणीने पोलिसांना दिली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.