

वॉशिंग्टन/दिल्ली; वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेश हा केवळ आणि केवळ भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचलवर फक्त भारताचा हक्क आहे, अशा आशयाचे विधेयक सिनेटर जेफ मर्कले आणि बिल हॅगर्टी यांनी अमेरिकन संसदेत सादर केले आहे. अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याने भारतीय जवानांनी तडाखेबाज प्रत्युत्तर देत चिन्यांना हुसकावून लावल्याची घटना नुकतीच घडली होती. अरुणाचल प्रदेशचा भाग चीन आपल्या नकाशातही समाविष्ट करतो. वारंवार अरुणाचलवर मालकीचा दावा करतो.
अमेरिका अरुणाचल प्रदेशकडे तो भारताचा एक भाग आहे, या भूमिकेतूनच बघतो. चीनचा या भागाशी काहीही संबंध नाही. आमची मॅकमोहन रेषेला मान्यता आहे. वादग्रस्त भागात गावे वसविणे, दोन्ही देशांतील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे, आदींचा आम्ही निषेध करतो, असे चीनविषयक अमेरिकन सिनेट समितीचे अध्यक्ष मर्कले यांनी यावेळी सांगितले.
भारतीय पंतप्रधानांवरील बीबीसीची डाक्युमेंट्री हा एक प्रपोगंडा व्हिडीओ आहे. ती केवळ घाणेरडी पत्रकारिता आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणात क्लिन चीट दिलेली असताना माध्यमे अशा प्रकारचे प्रसारण का आणि कसे करू शकतात, याचेच मला आश्चर्य वाटते, असेही ब्लॅकमन यांनी म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे पाकिस्तानने नष्ट करावी. भारतीय उपखंडात शांतता कायम राहावी म्हणून पाकने काळजी घ्यावी आणि आपले घर (अर्थव्यवस्था) सांभाळावे.
– बॉब ब्लॅकमन, खासदार, हुजूर पक्ष, ब्रिटन