अमेरिकेतील गाव वसलेय पाताळात

अमेरिकेतील गाव वसलेय पाताळात
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'स्वर्ग आणि पाताळ' याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार. लोकांच्या धारणेनुसार 'स्वर्ग' हा अवकाशात तर पाताळ हा खोल जमिनीखाली आहे. यासंदर्भात कोणालाच खरे माहीत नाही. मात्र, 'सुपरपॉवर' म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेत असे एक गाव आहे की ते पाताळात वसले आहे, अशी कल्पना केल्यास चुकीचे ठरू नये. कारण हे गाव जमिनीखाली तब्बल तीन हजार फूट खोलीवर वसले आहे.

जगभरात अशी अनेक गावे आहेत की, त्यांची विशेषता ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. यापैकी काही गावात तर जुळीच जन्मतात, तर काही गावात एकच किडनी असलेले लोक आढळतात. या यादीत आता या अमेरिकन गावाचाही समावेश करावा लागेल. हे गाव जमिनीपासून तीन हजार फूट खोलीवर वसले आहे. प्रसिद्ध ग्रँड केनियनच्या हवासू केनियन भागात असलेल्या या गावाचे नाव 'सुपाई' असे आहे. जगातच सर्वाधिक खोल भागात वसलेल्या या पाताळलोकी गावाला भेट देण्यास पर्यटकांची पहिली पसंदी असते. दरवर्षी सुमारे 55 लाख लोक 'सुपाई'ला भेट देतात. येथे राहणार्‍या लोकांना 'रेड इंडियन' म्हटले जाते. सध्या या गावात 208 लोक राहतात.

येथे जाण्यासाठी अत्यंत कमी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे त्यांचा जगाशी संपर्क नसतो. सध्या या गावाला जायचे असेल तर खेचराचा अथवा हवाई जहाजाचा वापर केला जातो. तसेच सुपाईत अजूनही इंटरनेट सेवा उपलब्ध झालेली नाही. यामुळे लोक संदेशाची देवाण-घेवाण करण्यासाठी आजही पत्रांचा वापर करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news