Dutch Princess: कोण आहेत राजकुमारी कॅथरिना-अमालिया आणि अलेक्सिया? ज्यांच्या हत्येचा रचला गेला होता कट?

नेदरलँडची भावी राणी राजकुमारी कॅथरिना-अमालिया आणि तिची धाकटी बहीण राजकुमारी ॲलेक्सिया यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
Dutch Princess Amalia
Dutch Princess Amalia and Alexiafile photo
Published on
Updated on

Dutch Princess Amalia and Alexia

द हेग: नेदरलँडची भावी राणी राजकुमारी कॅथरिना-अमालिया आणि तिची धाकटी बहीण राजकुमारी ॲलेक्सिया यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. द हेग येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे डच राजघराण्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

शस्त्रांवर राजकन्यांच्या नावांचा उल्लेख

अटक करण्यात आलेल्या संशयिताकडे नाझी विचारसरणीशी संबंधित चिन्हे कोरलेली कुऱ्हाड आणि इतर शस्त्रे सापडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या शस्त्रांवर राजकन्या ॲलेक्सियाच्या नावाचा उल्लेख असून त्यासोबतच काही जहाल घोषणाही लिहिलेल्या होत्या. तपास अधिकाऱ्यांना एक हस्तलिखित चिठ्ठीही सापडली आहे, ज्यामध्ये 'अमालिया' आणि 'ॲलेक्सिया' या दोन्ही राजकन्यांच्या नावांसमोर 'रक्तपात' असा शब्द लिहिलेला होता. यावरून या दोन्ही बहिणींवर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Dutch Princess Amalia
नक्षलमुक्तीच्या दिशेने...

सुरक्षा यंत्रणा सतर्क

संशयित आरोपीचा कोणत्याही विशिष्ट दहशतवादी गटाशी संबंध आहे का, याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, त्याच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून तो टोकाच्या विचारसरणीने प्रेरित असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलिकडेच पार पडलेल्या 'किंग्स डे' सोहळ्यादरम्यान राजघराण्यातील सदस्य जनतेत मिसळले होते, त्याच काळात हा कट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

राजकन्या अमालियाचे आयुष्य निर्बंधांच्या छायेत

राजा विलेम-अलेक्झांडर यांची मोठी मुलगी राजकुमारी कॅथरिना-अमालिया ही डच सिंहासनाची पहिली वारसदार आहे, तर तिची बहीण राजकुमारी अलेक्सिया ही दुसऱ्या क्रमांकाची वारसदार आहे. अमालियाविरुद्ध रचलेला हा कट तिच्या जीवावर उठण्याचा पहिलाच प्रयत्न नव्हता. २० वर्षीय अमलिया हिच्या सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. २०२२ मध्ये संघटित गुन्हेगारी गटांकडून मिळालेल्या धमक्यांमुळे तिला तिचे विद्यापीठातील वसतिगृह सोडावे लागले होते. राणी मॅक्सिमा यांनी एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती की, या धमक्यांमुळे अमलियाला सामान्य मुलींप्रमाणे घराबाहेरही पडता येत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव तिला काही काळ स्पेनमधील माद्रिद येथे राहावे लागले होते, जेथे तिने काही प्रमाणात मुक्त जीवन अनुभवले.

अमलिया सध्या अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठात राजकारण, मानसशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्र या विषयांचे शिक्षण घेत आहे. भावी राणी म्हणून तिच्यावर अनेक घटनात्मक जबाबदाऱ्या आहेत, मात्र सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे तिच्या सार्वजनिक आयुष्यावर मर्यादा आल्या आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू असून, लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Dutch Princess Amalia
US political system | अमेरिकन राजकारण अन् नैतिकता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news