

न्यूयॉर्क : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसाठी प्रसिद्ध असलेले अटकामा वाळवंटही आता बहरू लागले आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर सुमारे 1600 कि.मी. परिसरात पसरलेल्या या वाळवंटात कधीच पाऊस पडत नसतो. क्वचित कधी तरी पाऊस झालाच तर ती मोठी बातमी बनते.
अटकामा वाळवंटात पाऊस पडत नसला तरी या परिसरात एक खास इको-सिस्टीम अस्तित्वात आहे. येथील अत्यंत प्रतिकूल परीस्थितीतही असंख्य जीव अस्तित्वात आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या जीवांचा समावेश आहे. असे असले तरी गेल्या पाच ते दहा वर्षांत एकदाच सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान या वाळवंटात चांगला पाऊस पडतो. यामुळे काही काळ का होईना हे वाळंटही आता बहरू लागले आहे.
संशोधकांनी सांगितले की, अटकामा वाळवंटात पाऊस बरसल्यानंतर खास प्रकारच्या पुसिपॉ किस्टैनथे लॉगिस्कापा प्रजातीच्या फुलांचा बहर येऊ लागतो. या फुलांच्या रंगात विविधता असते. ही फुले अगदी फुलपाखरांसारखीच दिसतात. यामुळे परागीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आकर्षित होतात. मात्र, हे कीटक नेमके कोठून येतात, हा संशोधनाचा विषय आहे. गेल्यावर्षी या वाळवंटाच्या चिलीनजीकच्या कॅल्डेरानजीक असलेल्या लहानशा परिसराचे शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यावेळी त्यांना विविध प्रकारची व विविध रंगांची उधळण पाहावयास मिळाली. यामुळे भविष्यात या वाळवंटाचा जास्त भाग फुललेला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.