

वेगवेगळ्या अर्थविषयक वातावरणात काम करण्याची क्षमता सिद्ध झाल्यास अकाऊंटिंग अभ्यासक्रमाचा करिअरला फायदा होतो. करिअरसाठी या क्षेत्रात मोठा वाव असून त्यासाठी कोणती पदवी कोणत्या क्षेत्राला पूरक आहे, याची माहिती घेवू.
* चार्टर्ड अकाऊंट : आर्थिक क्षेत्रात आजघडीला चार्टड अकाऊंटला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारात चार्टड अकाऊंटची गरज भासते. व्यवसाय, व्यापार, आर्थिक सेवा, बँकिंग, सार्वजनिक क्षेत्र यात चार्टर्ड अकाऊंटची नितांत गरज असते. याशिवाय स्वत: आर्थिक सल्लागार म्हणून फर्म सुरू करून सेवा देऊ शकतात.
चार्टर्ड अकाऊटंट म्हणून व्यवसाय करणारे असंख्य मंडळी आपल्याला दिसतात. चार्टड अकाऊंटटचा अभ्यासक्रम कठिण आणि अवघड असला तरी यात एकदा यश मिळवल्यास भवितव्यातील संभाव्य अर्थिक अडथळे आपोआप दूर होतात.
सदासर्वकाळात हमखास व्यवसाय आणि उत्पन्न देणारा म्हणून चार्टड अकाऊंट अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. नामांकित कंपन्या, सेलिब्रिटी यांचे आर्थिक गणीत जुळवण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटटला मोठी मागणी आहे.
* सर्टिफाइड अकाऊंटट : एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत आर्थिक प्रशासन सांभाळण्यासाठी कुशल अकाऊंटटची गरज असते. बहुतांशी चार्टड अकाऊंट हे स्वतंत्रपणे व्यवसाय करत असतात आणि ते विविध कंपन्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करत असतात. परंतु कंपनीला स्वत:च्या आर्थिक सल्लागाराची गरज असते.
सर्टिफाइड अकाऊंट अभ्यासक्रम ही कंपनीची गरज पूर्ण करतो. कोणत्याही आर्थिकसंबंधी व्यवसायिक अभ्यासक्रम हा जॉब मिळवून देण्यास फायदेशीर ठरतो.
सर्टिफाइड अकाऊंटट पदवी घेतल्यानंतर फायन्शाशियल मॅनेजमेंटमध्येदेखील डिप्लोमा प्राप्त करता येते. अकाऊंटिग आणि फायनान्सचे शास्त्रोत शिक्षण फायन्शियल मॅनेजमेंटमध्ये दिले जाते. सर्व सर्टिफाइड अकाऊंटस विषय हे असोसिएशन ऑफ चार्टड सर्टिफाइड अकाऊंट (एसीसीए) शी जोडलेले असतात.
* पब्लिक फायनान्स अकाऊंटंट : स्थानिक स्वराज संस्था, सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा, रुग्णालय या क्षेत्रात पब्लिक फायनान्स अकाऊंटच्या माध्यमातून करियर करता येते. याशिवाय तुम्ही चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनाशिंयल अँड अकाऊंटसी (सीआयपीएफए) चे देखील सदस्य असतात.
* मॅनेजमेंट अकाऊंट : मॅनेजमेंट अकाऊंटसचा अभ्यासक्रम हा कंपनीच्या धोरणात्मक घटकाशी संबंधित आहे. मॅनेजमेंट अकाऊंटधारक हा कंपनीची अर्थविषयक धोरण राबवण्यासाठी जबाबदारी घेत असतो. जर तुम्हाला मॅनेजमेंट अकाऊंटमध्ये रुची असेल तर चार्टड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंट (सीआयएम) शी संलग्न असलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. (अकाऊंटिंग)