Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरला टोमॅटोचा भाव! कंपनी पहिल्यांदाच नफ्यात; गुंतवणुकदारांना दिलासा

Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरला टोमॅटोचा भाव! कंपनी पहिल्यांदाच नफ्यात; गुंतवणुकदारांना दिलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Zomato Share Price : फूड डिलिव्हरी सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या झोमॅटोने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रथमच नफा नोंद केला आहे. त्यामुळे शेअर बाजारात शुक्रवारी झोमॅटोच्या शेअरचा दर १२ टक्क्यांनी वधारला.

गुरुवारी झोमॅटोचा शेअर (Zomato Share Price) ८६.२२ रुपयांना बंद झाला होता. तर शुक्रवारी सकाळी हा शेअर ८९ रुपयांना ओपन झाला. त्यानंतर हा शेअर ९८.३९ रुपयांवर पोहोचला होता. यात नंतर किरकोळ घसरण होऊन हा शेअर ९६.२३ रुपयांवर आला होता.

गुरुवारी झोमॅटोने या वर्षातील पहिला तिमाही अहवाल जाहीर केला. यात कंपनीला निव्वळ नफा २ कोटी रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर YOY (Year on Year) तोटा १८६ कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. तर गतवर्षीच्या १४१४ कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत कंपनीचा महसुल २४१६ कोटी रुपये झालेला आहे.

जुलै २०२१ला झोमॅटोचा शेअर बाजारावर (Zomato Share Price) नोंदली गेली. इश्यु प्राईस ७६ रुपये असताना कंपनीचा शेअर ११५ रुपयांवर नोंद झाला. पण त्यानंतर लिस्टिंग प्राईसपेक्षा हा शेअर नेहमी खालच्या किंमतीवरच राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news