Zero Figure : झिरो फिगरचा हट्ट ठरू शकतो घातक ‘असे’ होऊ शकतात दुष्परिणाम

Zero Figure : झिरो फिगरचा हट्ट ठरू शकतो घातक ‘असे’ होऊ शकतात दुष्परिणाम
Published on
Updated on

Zero Figure : आजची तरुणी ही भविष्यातील माता आहे. त्यामुळे तिची काळजी आतापासूनच नाही घेतली, तर भविष्यातील माता अशक्त आणि अकार्यक्षम होईल, हे लक्षात घ्यायला हवे. ही गोष्ट शक्यतो आईनेच लक्षात ठेवायला हवी. हे करत असताना मुलीचा आहार, व्यायाम याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. प्रसंगी तिच्याकडून करून घ्यायला हवे.

हल्ली उत्तम आरोग्याबरोबर झिरो साईजचे Zero Figure  वेड सर्वत्र वाढले आहे. तरुणींमध्ये त्यांच्या आरोग्यासंदर्भात भरपूर जागरुकता निर्माण झाली आहे. फिगर मेंटेन करण्यासाठी फिटनेस सेंटर व योगा क्लासेसमध्ये जाऊन महिलादेखील हजारो रुपये खर्च करताना दिसत आहेत. जाड शरीरयष्टी असलेल्या तरुणी अथवा महिलांनी झिरो फिगरचा आग्रह धरणे ठीक आहे. मात्र, ज्या तरुणी आधीच सडपातळ आहे त्यांनी झिरो फिगरचा हट्ट करू नये. हा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. हा हट्ट म्हणजे आजारपण ओढवून घेणे आणि भविष्यासाठी आपले मातृत्व धोक्यात घालवणे असेच होईल.

Zero Figure : महाविद्यालयीन तरुणी सकाळी लवकर घराबाहेर पडतात. बाहेर पडताना नाष्टा करत नाहीत. टिफीन नेत नाहीत. कॉलेज कँटिनमध्ये काही तळलेले पदार्थ असतात म्हणून तेही खाल्ले जात नाहीत. पर्समध्ये एखादे सफरचंद किंवा कोणतेही फळ टाकून ते खाल्ले जात नाही अन् मग झिरो फिगरच्या नावाखाली एक दिवस अशक्तपणा येऊन चक्कर आल्याने कोसळतात. मग, मात्र हसे होते. असे हसे होऊ नये म्हणून या वयामध्ये आईने ही खास काळजी घ्यायला हवी. नाश्त्याचे महत्त्व पटवून द्यायला हवे.

Zero Figure : खरे तर मुलींना या वयामध्ये संपूर्ण आहार, न्याहारी, फळे, सूप घेतले पाहिजे. कारण, आजची ही तरुणी भविष्यातील माता असते. आई सशक्त असेल, तर ती तिच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवू शकते. आरोग्यासाठी उत्तम आहार, विहार या टिप्स मुलांना देऊ शकते. आताच्या मुलींमध्ये याविषयी काहीच जागरुकता नसेल, तर पुढे त्या त्यांच्या पिढीला काय आरोग्याचे धडे देणार? त्यामुळे वजन जास्त असल्यास प्राणायाम, व्यायाम , डाएट करून हळूहळू वजन कमी करता येते; मात्र वेगळ्या मार्गाने झटपट वजन कमी केल्यास त्याचा शरीर तसेच सौंदर्यावर विपरीत परिणाम होतो. आपल्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून सौंदर्य आणि शरीर या दोन्ही गोष्टी जपल्यास भविष्यातील माता ही सुद़ृढच होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news