‘Z’ category: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय
पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना संपूर्ण देशभरात 'झेड' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना झेड श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. IB रिपोर्टनंतर केंद्रीय यंत्रणेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ('Z' category )
इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या धमकी समज अहवालानंतर, गृह मंत्रालयाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तृणमूल काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष यावेळी गोंधळ घालत आहेत. हे लक्षात घेऊन आयबीचा थ्रेट पर्सेप्शन रिपोर्ट आला, त्या आधारावर मुख्य निवडणूक आयुक्तांना सुरक्षा देण्यात आली आहे.
Z श्रेणीत नेमकी काय सुरक्षा असेल?
झेड श्रेणीच्या सुरक्षेसाठी एकूण 33 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सशस्त्र दलाचे 10 सशस्त्र स्थिर रक्षक व्हीआयपींच्या घरी मुक्काम करतात. 6 तास PSO, 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो तीन शिफ्टमध्ये, 2 शिफ्टमध्ये वॉचर्स आणि 3 प्रशिक्षित ड्रायव्हर्स चोवीस तास उपस्थित असतात.
हे ही वाचा:

