Yuzvendra Chahal : ‘आमचं एकदम OK चाललंय!’ धनश्रीसोबतच्या नात्यावरून युजवेंद्रने सोडले मौन

Yuzvendra Chahal : ‘आमचं एकदम OK चाललंय!’ धनश्रीसोबतच्या नात्यावरून युजवेंद्रने सोडले मौन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मासोबतच्या नात्याबाबत मौन सोडले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांना त्याने अफवा असल्याचे म्हटले असून या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका असे आवाहनही युझवेंद्रने केले आहे. यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की धनश्रीने (dhanashree varma) इन्स्टाग्रामवर तिचे आडनाव बदलले आहे. त्यानंतर युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये असे काही लिहिले, ज्यामुळे चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधले.

युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (dhanashree varma) यांच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज गुरुवारी सकाळपासून सोशल मीडियावर लावला जात आहे. मात्र, युजवेंद्र चहलने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट शेअर करून आमचं ओके सुरू असून आमच्या दोघांमध्ये दूरावा नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

चहलने म्हटलंय की, 'आमच्या नात्याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती. कृपया हे ताबडतोब थांबवा.' यासोबतच युझवेंद्र चहलनेही हात जोडलेला एक इमोजी सुद्धा शेअर केला आहे.

युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नाव बदलले. तिने तिच्या नावासमोरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले आणि फक्त धनश्री वर्मा इतकेच नाव ठेवले. यानंतर युजवेंद्र चहलची एक इन्स्टा स्टोरी समोर आली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, 'नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे.' यानंतर या जोदप्याच्या वेगवेगळ्या कृतीने चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

एकीकडे धनश्री वर्माने (dhanashree varma) आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले, तर दुसरीकडे युजवेंद्र चहलची रहस्यमय पोस्ट समोर आल्याने सोशल मीडियावर चांगल्याच उलटसुलट चर्चा रंगल्या. त्यामुळे क्रिकेटसह मनोरंजन क्षेत्रातील वातावरण तापले. जेव्हा चाहत्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी चर्चील्या जात होत्या तेव्हा काही काळानंतर युजवेंद्र चहलला पुढे यावे लागले आणि या प्रकरणाला पूर्णविराम द्यावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news