

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी चिंचवडमध्ये चिखली टाळगाव कमानी शेजारी सोन्या तापकीर (वय २०) या तरुणाचा अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून खून केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेची घटनास्थळी दाखल झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.