ओतूर: फॉर्च्युनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, ऐन भाऊबीजेला पाच बहिणी भावाला मुकल्या

ओतूर: फॉर्च्युनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, ऐन भाऊबीजेला पाच बहिणी भावाला मुकल्या
Published on
Updated on

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: वेगवान फॉर्च्युनर गाडीने (एम एच ४६ बी ई ५५६६) जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील (एम एच १४ डी वाय ३०४१) एकजण उपचारापूर्वीच मृत्यू पावला असून दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ओतूर पोलीसांनी दिली. नगर – कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपा समोर मंगळवारी( दि.२५) सायंकाळी झाला असून ऐन दिवाळी सणात भाऊबीजेच्या कालावधीत पाच बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेश घाडगे (रा.पिंपळगाव जोगा ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून दुचाकीवर मागे बसलेला सिद्धेश कोकणे हा गंभीर जखमी झाल्याने अत्यावस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर चालक शरद दिनकर गुंड (रा.वडगाव दर्या,ता.पारनेर, जि. अहमदनगर) यांस ताब्यात घेतले असून याबाबतचा अधिक तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नामदेव बांबळे हे करीत आहेत.

गरिबांना वाली कोण

राजकीय नेत्यांनी अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्या ऐवजी फॉर्च्युनर चालकाचीच जास्तीची अधिक चौकशी केल्याने व दुःखद कुटुंबाला आधार मिळावा म्हणून एकही शब्द न उच्चारल्यामुळे परिसरात खंत व्यक्त केली जात असून गरिबांना वाली आहे की नाही, असा विषय चर्चेचा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news