

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणार्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. सूरज संतोष पवार (वय 21) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवार याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मोबाइलवर छायाचित्रे तसेच ध्वनी चित्रफित काढली. समाजमाध्यमात ती प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलगी गर्भवती झाली. आरोपी तिला धमकावत होता. ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. मुलीने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सूरजला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करत आहेत.