प्रातिनिधिक छायाचित्र.
Latest
यवतमाळ : कौटुंबिक कलहातून मायलेकीची आत्महत्या
यवतमाळ ; पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक कलहातून मायलेकीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. उमरखेड तालुक्यातील दराटी पोलीस ठाणेअंतर्गत भवानी गावात ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.०३) मध्यरात्री घडली. आज शुक्रवारी (दि.०४) ही घटना उघडकीस आली.नंदा किशोर वानखेडे (वय ४०) आणि साक्षी (वय १६) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत.
नंदा यांचा त्यांच्या पतीसोबत घरगुती वाद झाला. राग सहन न झाल्याने त्यांनी मुलगी साक्षी (वय १६) हिला सोबत घेतले आणि रात्रीचेच घर साडले. या दोघींनी गुरुवारी रात्री भवानी गावापासून वाहणाऱ्या नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नंदा वानखेडे यांच्या पश्चात दोन मुले आहे.

