

यवतमाळ; पुढारी ऑनलाईन डेस्क : यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गुरुवारी (दि.५) एका रुग्णाने निवासी डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. या घटनेत ते डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्या बचावासाठी आलेल्या दुसऱ्या डॉक्टरलाही दुखापत झाली आहे.
यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णाने निवासी डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. या रूग्णालयातील ही पहिलीच घटना नसून याआधीही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाला होता. याबाबत तेथील डॉक्टरांनी सरकारला रूग्णालयात सुरक्षा वाढवण्याची विनंती केली होती. परंतु अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे .या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.