

मुंबई, वृत्तसंस्था : वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या हंगामाचा नारळ आज (4 मार्च) ला मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर फुटणार आहे. हा सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना हा अंबानी विरुद्ध अदानी असाही असणार आहे. कारण गुजरात जायंट्सच्या संघाची मालकी ही अदानींकडे आहे. डब्ल्यूपीएलमध्ये 20 लीग सामने आणि दोन प्ले ऑफचे सामने होणार आहेत. ही स्पर्धा 23 दिवस चालणार आहे.
वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे. सामन्यांची वेळ ही आयपीएलसारखीच दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 7.30 अशी असणार आहे.
आजचा सामना
गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स
वेळ : संध्या.7.30 वाजता