

Worlds Best Beach : जगभरात फिरण्यासाठी लोकांची नेहमी पसंती युरोप असते. युरोपमध्ये पर्यटनासाठी वातावरण अनुकूल असल्याने परदेशात फिरण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती युरोप असते. युरोपमधील वातावरण अत्यंत फ्री असल्याने पर्यटक सुट्ट्यांचा आनंद युरोपच्या समुद्रकिनाऱ्यांवर घालवत असतात. दरम्यान युरोपमध्ये पर्यंटकांची मंदीयाळी मोठ्या प्रमाणात जमत असून यामुळे सेक्स टुरिझम वाढले आहे.
पर्यटकांच्या कृत्यामुळे युरोपीय देशातील सभ्यता, संस्कृती, स्थानिक जीवन आणि ऐतिहासिक स्थळांची प्रचंड हानी होताना दिसत आहे. परदेशातून युरोपमध्ये येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यावरण आणि ऐतिहासिक ठिकाणी प्रदूषण करत असल्याचा अहवाल पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे.
याचबरोबर युरोपमध्ये जगातील सुंदर समुद्रकिनारे आहेत. पण एका अभ्यासानुसार, स्पेनचे प्रसिद्ध ग्रॅन कॅनरिया बेटावर पर्यटक सेक्स करून कंडोम तिथेच टाकत असल्याने तेथील सौंदर्य खराब होत आहे. या बेटांवर नैसर्गिक गोष्टींचे संर्वधन केले जाते. तेथील वाळूच्या ढिगाऱ्यांना १९८२ पासून तिथल्या सरकारने कायदेशीर संरक्षण दिले आहे.
आफ्रिका आणि युरोपमधील स्थलांतरित पक्षी या बेटांवर वाळूच्या ढिगाऱ्यांचा आसरा घेत असतात. पण आता काही पर्यटकही याचा फायदा घेत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार सेक्स टुरिझममुळे तिथल्या नैसर्गिक गोष्टींना बाधा पोहोचत आहे. (Worlds Best Beach)
संशोधकांना समुद्रकिनाऱ्यावर २९८ सेक्स स्पॉट सापडले आहेत. ही ठिकाणं झुडूप आणि ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांचा वापर काही पर्यटक सेक्ससाठी करत आहेत. संशोधकांच्या मते, पर्यटकांच्या या कृतींचा थेट आठ स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींवरही परिणाम होत आहे.
पर्यटक या वनस्पती तुडवतात, झाडे आणि वाळू काढून ते सेक्स स्पॉट बनवतात. इतकेच नाही तर पर्यटक या वस्तूंचे कुंपण करून त्यात सिगारेट, कंडोम, टॉयलेट पेपर, वाइप्स, कॅन असा कचरा टाकतात. या ढिगाऱ्यांचा वापर पर्यटक शौचालय म्हणूनही करतात. सेक्स स्पॉट जितके दूर असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा तिथे होतो. या भागात कचराकुंड्या ठेवल्या आहेत. पण त्या लवकर भरत असल्याने लोक बाहेर कचरा करतात.
ग्रेन कॅनरियामध्ये महाकाय सरडा प्रसिद्ध आहे, या सरड्याला पाहण्यासाठी पर्यटक लांबून येत असतात. दरम्यान या ठिकाणी पर्यटकांनी सेक्स करून टाकलेले कंडोम खाल्ल्याने या सरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हा बीच समलैंगिकांमध्येही खूप लोकप्रिय आहे.
तेथील संशोधकांच्या मते, अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीतील पर्यटक येथे येतात. काही पर्यटक पर्यटन विकासाला हानी पोहोचवत आहेत. आम्ही सार्वजनिक लैंगिक संबंध संपवण्यास सांगत नाही, परंतु होणाऱ्या हानीबद्दल जागरुक व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे त्यांचे मत आहे.