

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 20 षटकांत 7 गडी गमावत भारताला 152 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृतीने केलेली झुंजार अर्धशतकी आणि रिचाने केलेली दमदार खेळी भारताला विजयी करू शकली नाही. सामन्यात भारताने निर्धारित ओव्हरमध्ये 5 बाद 140 धावा केल्या. इंग्लडकडून गोलंदाजी करताना ब्रुंट आणि बेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (Women's T20 WC)
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लडकडून अनुभवी फलंदाज ब्रुंटने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लड संघाने भारताला 152 धावाचे आव्हान दिले होते. तिला जोन्स (40) आणि नाईट (28) यांनी साथ दिली. तर गोलंदाजी करताना भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर सर्वाधिक 5 विकेट घेत इंग्लडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. तिच्यासह दिप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. (Women's T20 WC)
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात संथ झाली. एका बाजूने विकेट पडत असताना स्मृतीने संयमी आणि आक्रमक खेळी करत आपले अर्धशतक केले. स्मृतीने व रिचाने केलेली झुंजार खेळी भारताला विजयी करू शकली नाही. इंग्लंडकडून ब्रुंट आणि बेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा;