

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला T20 आशिया चषक 2022 स्पर्धेच्या 15 व्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 59 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ केवळ 100 धावा करू शकला. शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली. तर दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी गोलंदाजीत अप्रतिम केलेल्या कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशवर ५९ धावांनी विजय मिळवला.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 100 धावा करू शकला. संघासाठी फरगाना आणि मुर्शिदा खातून सलामीला आल्या. फरगाना 40 चेंडूंचा सामना करत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यादरम्यान तिने 3 चौकार मारले. मुर्शिदाने 25 चेंडूत 21 धावा केल्या. कर्णधार निगार सुलतानाने 29 चेंडूत 36 धावा केल्या. त्यांच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. याखेरीज दुहेरी आकडा कोणीही पार करू शकला नाही.
हेही वाचा;